पैठणला बाराशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित आर्य चाणक्य प्रा. विद्यामंदिर, पैठण येथील १२३३ विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनी योग व प्रणयमाचे धडे घेतले.

ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः या श्लोकाच्या अर्थ असा की बिंदुसहित असलेल्या ओंकाराचे योगीजन नित्य ध्यान करतात. सर्व कामना आणि मोक्ष प्रदान करणाऱ्या त्या ओंकाराला माझा वारंवार नमस्कार असो. अशा श्लोकाचा अर्थडोळ्यासमोर ठेवत त्रिवार ओंकार घेत योग दिनास प्रारंभ करत बाराव्या आंतरराष्ट्रीय योगदिन पैठण येथील आर्य चाणक्य प्रा. विद्यामंदिर मधील इयत्ता पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदविला. 

क्रीडा शिक्षक सतिश आहेर यांनी प्राणायमाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शनाप्रमाणे विद्यार्थ्यांनी करून दाखविले. याप्रसंगी लहान इयत्तांच्या अनुषंगाने पूरक हालचाली करत उभे राहून करावयाची ताडासन, वृक्षासन, त्रिकोनासन, हस्तपादासन नंतर बसून करावयाचे पद्मासन आसने नंतर सूर्यनमस्कार आणि प्राणायाम सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार असणाऱ्या सूर्यनमस्कारांची माहिती देण्यात आली. 

त्यानंतर कपालभाती, अनुलोम विलोम, भस्त्रीका हे प्राणायाम करून ध्यान इत्यादी नंतर विविध योग -प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक करून योगाचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी व सर्व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सतिश आहेर यांनी केले.